घरमनोरंजन...म्हणून ए लिस्टमधील अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला, मल्लिकाने सांगितलं 'कारण'

…म्हणून ए लिस्टमधील अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला, मल्लिकाने सांगितलं ‘कारण’

Subscribe

मल्लिका शेरावतने सांगितलं चित्रपचसृष्टीचं खरं रूप अभिनेत्री मल्लिका शेरावतने एका इंटरव्यूमध्ये चित्रपचसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल मोकळेपणाने भाष्य केले.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखली जाते. मर्डर आणि ख्वाहिश यांसारख्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स करणाऱ्या मल्लिका शेरावतने चित्रपटसृष्टीबाबत नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. खरंतर एक इंटरव्यूमध्ये मल्लिका शेरावतने चित्रपचसृष्टीचं खरं रूप सर्वांसमोर मांडलं आहे. सोबतचं सांगितलं की, कशा प्रकारे एखाद्या अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये आपली भूमिका वाचवण्यासाठी कास्टिंग काउचचं शिकार व्हावं लागतं.

मल्लिका शेरावतने सांगितलं चित्रपचसृष्टीचं खरं रूप

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

- Advertisement -

अभिनेत्री मल्लिका शेरावतने एका इंटरव्यूमध्ये चित्रपचसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. त्यावेळी ती म्हणाली की, जेव्हा तिने काही गोष्टींना नकार दिला त्यावेळी अनेक चांगले प्रोजेक्ट्स तिच्या हातून निघून गेले. सर्व ए लिस्टमधील अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला, कारण मी काही तडजोडी करण्यास तयार नव्हते. त्या अभिनेत्यांना अश्या अभिनेत्री आवडतात, ज्या त्यांच्या दबावाखाली राहतात आणि त्यांच्यासोबत तडजोड करतात. परंतु मी अशी नाही. ही माझी व्यक्तिमत्व तसं नाही. मी स्वताःला कोणाच्या इच्छेनुसार नाही वागवू शकत.

मल्लिका शेरावत पुढे म्हणाली की, “जर चित्रपटातल्या हिरोने रात्री ३ वाजता फोन करून बोलावलं, तर तुला जावं लागतं. पण तुम्ही त्याच्या घरी गेला नाहीत तर त्या चित्रपटातून तुम्हाला बाहेर काढलं जाणार हे नक्की”

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी सुद्धा मल्लिका शेरावतने चित्रपटसृष्टीवर आणि मीडियावर तिला मेंटली टॉर्चर केल्याचा मोठा आरोप लावला होता. येत्या काळात मल्लिका ‘RK/RKAY’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.


हेही वाचा :‘सिंघम ३’ चं लवकरच सुरू होणार शूटिंग; अजय देवगण पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -