घरदेश-विदेशमाझ्या नकळत घरात पैसा ठेवला, बंगाल एसएससी घोटाळ्यावर अर्पिता मुखर्जीची प्रतिक्रिया

माझ्या नकळत घरात पैसा ठेवला, बंगाल एसएससी घोटाळ्यावर अर्पिता मुखर्जीची प्रतिक्रिया

Subscribe

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसच्या निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जीला अटक केली. या प्रकरणावर आता आर्पिता मुखर्जीनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्पिता मुखर्जी म्हणाली की, तिच्या घरातून जप्त केलेले कोट्यावधी रुपये तिला कोणतीही पूर्व कल्पना न देता ठेवण्यात आले होते. ईडीने मुखर्जीच्या दक्षिण – पश्चिम कोलकत्ता आणि बेलघोरिया येथील दोन प्लॅटमधून दागिन्यांसह सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

माझ्या नकळत घरात ठेवण्यात आला पैसा

चॅटर्जी आणि मुखर्जी या दोघांनाही दिवसभरात वैद्यकीय तपासणीसाठी शहराच्या दक्षिणेकडील ईएसआय जोका येथे नेण्यात आले. यावेळी वाहनातून उतरताना मुखर्जीनी प्रसार माध्यमांना सांगितले की, माझ्या नकळत घरात माझ्या घरात पैसे ठेवले गेले. ज्यामुळे यातून त्या कोणाकडे बोट दाखवत आहे याबद्दल अटकळ निर्माण झाली आहे.

- Advertisement -

जीएसटी नंबरच्या तपासात गुंतली ईडी

दुसरीकडे ईडी अर्पिता मुखर्जींशी सबंधित जीएसटी नंबरचीही चौकशी करत आहे. करचुकवेगिरीसाठी हा नंबर बेकायदेखीरपणे बनवण्यात आल्याची शक्यता आहे. ईडीने सोमवारी संध्याकाळी मुखर्जी यांच्या बेलघोरिया भागातील प्लॅटची झडती घेतली आणि आजूबाजूचे सीसीटीव्ह फुटेज गोळा केले.

ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुखर्जी यांनी ब्युटी पार्लर चालवण्यासाठी जीएसटी नंबरचा वापर केला. यात एक नंबर असाही आहे ज्याचा कोणत्याही व्यवसायाशी संबंध नाही, त्यामुळे हा नंबर कर चुकवेगिरीसाठी बनवण्यात आला होता का हे शोधण्याचा प्रयत्न ईडी करत आहे.

- Advertisement -

चॅटर्जी यांनी टीएमसीच्या निर्णयावर केली नाराजी व्यक्त

दरम्यान पार्थ चॅटर्जी यांची टीएमसीने मंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. यावर चॅटर्जी म्हणाले की, ते एका षड्यंत्राचे बळी” ठरले आहेत. त्यांना निलंबित करण्याच्या टीएमसीच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यावरील कारवाई योग्य आहे की नाही, हे येणारा काळच सांगेल, असेही चटर्जी म्हणाले. चॅटर्जी आणि मुखर्जी या दोघांनीही जप्त केलेले पैसे त्यांच्या मालकीचे नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी चटर्जी यांना बुधवारी पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोघांची 10 दिवसांची ईडी कोठडी संपणार आहे.


राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावाल्याशी आर्थिक संबंध! राऊतांच्या आरोपांची पुन्हा चर्चा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -