घरमनोरंजन'दोबारा'च्या निर्मात्यांनी थरार आणि रहस्याने भरलेल्या या चित्रपटाचे आणखी एक मनोरंजक पोस्टर...

‘दोबारा’च्या निर्मात्यांनी थरार आणि रहस्याने भरलेल्या या चित्रपटाचे आणखी एक मनोरंजक पोस्टर केले सादर!

Subscribe

'दोबारा'ची संकल्पना खूप वेगळी आहे आणि ती यापूर्वी कधीही सादर झालेली नव्हती. दोबारासारखा थ्रिलर चित्रपट बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

बहुप्रतिक्षित दोबारा ट्रेलरला जागतिक प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आपल्या आकर्षक दिसण्याने लक्ष्य वेधून घेत आहे. सध्या प्रेक्षक ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेमने प्रभावित झाले आहेत आणि निर्मात्यांकडून अधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

‘दोबारा’ची संकल्पना खूप वेगळी आहे आणि ती यापूर्वी कधीही सादर झालेली नव्हती. दोबारासारखा थ्रिलर चित्रपट बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी सोशल मीडियावरून दोबाराचे नवीन पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी लिहिले की, “ये मिस्ट्री तो और भी बढ़ती जा रही है। #दोबारा का ट्रेलर हुआ जारी”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

- Advertisement -

दरम्यान, ‘दोबारा’ला लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि फॅन्टासिया फिल्म फेस्टिव्हल 2022 सारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय, कल्ट क्रिएटर अनुराग कश्यप आणि एकता आर कपूर यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तापसी टीव्ही स्क्रीनवर एक सरप्राइज एलिमेंट म्हणून पाहायला मिळत आहे. आणि, प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले असून तापसीची ही टाइम ट्रॅव्हलची कहाणी कुठे घेऊन जाते याची प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.


हेही वाचा :भारतीय पुरुषांनी प्रेम दिले पण महिलांनी…; मल्लिका शेरावतने व्यक्त केली खदखद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -