घरमनोरंजनमनोरंजन विश्वात शोककळा; अभिनेत्री जमुना यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वात शोककळा; अभिनेत्री जमुना यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

सुपरस्टार रजनीकांत यांचे आवडते फाइटिंग कोच 'जुडो' रत्नम यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरले नाहीत की अजून एका निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

मनोरंजन जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचे आवडते फायटिंग कोच ‘जुडो’ रत्नम यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अजून सावरले नाहीत, तोपर्यंत अजून एका निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील तेलुगू अभिनेत्री जमुना यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या. अभिनेत्री जमुना यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केलाय.

अभिनेत्री जमुना यांनी शुक्रवारी हैदराबाद येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी फिल्म चेंबरमध्ये नेले जाण्याची शक्यता आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २०२२ हे वर्ष टॉलिवूडसाठीही वाईट वर्ष होते, कारण या काळात अनेक सुपरस्टार्सनी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या पश्चात त्यांचा मुलगा वामसी जुलुरी आणि मुलगी श्रवंती आहेत.

- Advertisement -
वयाच्या १६ व्या वर्षी केले पदार्पण

जमुना यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३६ रोजी कर्नाटकातील हम्पी येथे झाला. निप्पानी श्रीनिवास राव आणि कौशल्या देवी असं त्यांच्या आई-वडिलांचं नाव आहे. नंतर ते आंध्र प्रदेशात स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील दुग्गीराला येथून केले आणि शालेय जीवनात त्या एक रंगमंच कलाकार होत्या. जमुना यांचं खरं नाव जनाबाई होतं आणि त्यांनी १९५३ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी गरिकापरी राजा राव दिग्दर्शित ‘पुट्टीलू’ मधून करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री जमुना यांनी तेलुगू, तमीळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ११ हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. जमुना यांच्या निधनानं साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआर, महेश बाबू, चिरंजीवी या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जमुना यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

फिल्म इंडस्ट्रीसोबत राजकारणातही सक्रिय

फिल्म इंडस्ट्रीसोबतच अभिनेत्री जमुना यांनी राजकारणातही काम केलंय. त्यांनी त्यांचा काँग्रेसला पाठिंबा होता आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रभावाने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९८९ मध्ये त्या राजमुंद्रीमधून लोकसभेवर निवडून आल्या. मात्र, १९९१ मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारण सोडले. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि १९९० च्या उत्तरार्धात पक्षाचा प्रचार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -