घरअर्थजगतवर्षाला ५०० रुपयांची गुंतवणूक बनवेल करोडपती, जाणून घ्या केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

वर्षाला ५०० रुपयांची गुंतवणूक बनवेल करोडपती, जाणून घ्या केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

Subscribe

Public Provident Fund Scheme| या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याज मिळत असून गेल्या १० वर्षांतील हे सर्वांत कमी व्याज आहे. परंतु, पॉलिसी दरांत वाढ झाल्यानंतर पीपीएफच्या व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

Public Provident Fund Scheme| नवी दिल्ली – पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund) योजना सरकारने असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तयार केली होती. या योजनेची मॅच्युरिटी कालावधी (Maturity Period) १५ वर्षांचा असतो. तर, ५-५ वर्षांनी हा कालावधी वाढवताही येतो. पहिली मॅच्युरिटी पूर्ण होण्याच्या एक वर्षाच्या कालावधी वाढीसाठी अर्ज करावा लागतो. दिर्घ काळाच्या गुंतवणुकीसाठी केंद्राची ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आहे. (Know more about Public Provident Fund Scheme in Marathi)

पीपीएफ (PPF) एक ईईई (EEE) श्रेणीतील गुंतवणूक योजना आहे. याचा अर्थ यात गुंतवणूक, व्याज आणि पैसे काढण्यासाठी कोणताही कर द्यावा लागत नाही. यात तुम्ही जास्तीत जास्त ३ लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करू शकता. तसंच, कमीत कमी ५०० रुपयांची वार्षिक गुंतवणूक आवश्यक आहे. या योजनेत सध्या ७.१ टक्के व्याज मिळत असून गेल्या १० वर्षांतील हे सर्वांत कमी व्याज आहे. परंतु, पॉलिसी दरांत वाढ झाल्यानंतर पीपीएफच्या व्याजदरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आजपासून पाच दिवस संपावर?

ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळांवरून तुम्ही पीपीएफ खाते तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. खातं कसं तयार कराल, याची आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया.

- Advertisement -
  • बँकेच्या नेटबँकिंग पोर्टलवर लॉग इन करा.
  • पीपीएफ अकाऊंटच्या पर्यायावर क्लिक करा.
  • सेल्फ किंवा मायनर असा कोणताही तुम्हाला आवडेल तो पर्याय निवडा.
  • तिथे मागितलेली माहिती भरा.
  • जेवढी रक्कम तुम्हाला जमा करायची आहे ती रक्कम भरा.
  • यासाठी तुम्हाला ट्रांजेक्शन पासवर्ड मागितला जाईल किंवा ओटीपी मागितला जाईल.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं पीपीएफ अकाऊंट तयार होईल.
  • जी काही माहिती तुम्ही भरली आहे त्याची प्रिंटआऊट काढून घ्या.
  • ही माहिती तुम्हाला केवायसीसह बँकेलाही द्यावी लागणार आहे.

येथे तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासोबतच त्यात वृद्धीही होते. सहा वर्षांनंतर तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत यातून ५० टक्के रक्कमही काढू शकतात. एवढंच नव्हे तर या पीपीएफ खात्यातील जमा रक्कमेवर तुम्हाला कर्जसुद्धा मिळू शकतं.

हेही वाचा Budget 2023 | नोकरदारवर्गाकडून ‘या’ पाच अपेक्षा, Income Tax ची मर्यादा वाढणार?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -