घरमनोरंजनआदित्य नारायणच्या घरी आली नवी पाहुणी

आदित्य नारायणच्या घरी आली नवी पाहुणी

Subscribe

२४ फेब्रुवारीला त्याच्या पत्नीने मुंबई मधल्या एका हॉस्पीटलमध्ये मुलीला जन्म दिला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल आता आई-बाबा झाले आहेत. त्यांना एक गोंडस मुलगी झाली असून, त्यांच्या कुटुंबात आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मुलगी झाल्यामुळे आदित्य खूप खूश आहे. त्याला नेहमी मुलगीच हवी होती, देवाकडेही तो नेहमीच ही प्रार्थना करीत होता, जी आता देवाने ऐकली आहे.

देवाने माझी इच्छा पूर्ण केली

- Advertisement -

आदित्य नारायणने तो बाबा झाल्याची बातमी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. त्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबाबत माहिती दिली. त्याने सांगितलं की, 24 फेब्रुवारीला त्याच्या पत्नीने मुंबईमधल्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. श्वेताच्या गर्भावस्थेत तिला पाहिल्यावर सगळे जण तिला मुलगा होईल, असं म्हणायचे, परंतु मला नेहमी वाटायचं की मला पहिलं अपत्य मुलगीच व्हावी आणि म्हणूनच मी देवाकडे यासाठी नेहमी प्रार्थना करायचो, जी आता देवाने ऐकली. यानंतर आदित्य म्हणाला, मी आणि माझी पत्नी मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहोत.

श्वेताबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर

- Advertisement -

आदित्य म्हणाला की, जेव्हा श्वेता आमच्या मुलीला जन्म देत होती, तेव्हा मी तिच्यासोबतच होतो. त्यावेळी तिला झालेल्या सगळ्या वेदना मी अगदी जवळून पाहिल्या आहेत. तेव्हा मला जाणवलं की, एका महिलेमध्येच इतकी ताकद असू शकते हे सगळं पाहिल्यानंतर श्वेताबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर आता दुप्पट वाढला.

संगीत तिच्या हृदयात

बाबा बनलेला आदित्य म्हणाला की, आता माझ्या मुलीची संगीत यात्रा सुरू झाली आहे, मी तिच्यासाठी गाणं गायला सुरुवात सुद्धा केली आहे. संगीत तिच्या हृदयात आहे. पण तिला मोठं होऊन काय करायचं हे तिच्यावर निर्भर आहे.


हेही वाचा : Radhe Shyam Trailer Out : ‘राधेश्यामचा’ ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -