घरमनोरंजनRadhe Shyam Trailer Out : 'राधेश्यामचा' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट पाहण्यासाठी...

Radhe Shyam Trailer Out : ‘राधेश्यामचा’ ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

Subscribe

येत्या ११ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास सोबत पुजा हेगडे सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येईल. नुकताच या चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते ट्रेलर वर भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Radhe Shyam Trailer Out :  साउथचा सुपरस्टार प्रभास नेहमीच त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याचे सोशल मिडियावर ही अनेक चाहते आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तो नेहमीचं चर्चेत असतो. नुकताच त्याच्या ‘राधेश्याम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. परंतु आता प्रेक्षकांची आतुरती लवकरच संपणार आहे.

येत्या 11 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास सोबत पुजा हेगडे सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येईल. नुकताच या चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते ट्रेलरला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

- Advertisement -

राधेश्यामचा हा ट्रेलर एक मिनीट आठ सेकंदाचा आहे. ज्याची सुरूवात धमाकेदार अंदाजात होताना दिसून येतेय. या चित्रपटामध्ये प्रभास एका ज्योतिषाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ज्याची एक झलक ट्रेलरमध्ये दिसून येते आहे. या ट्रेलरमध्ये प्रभासचे दमदार डायलॉग सुद्धा आहेत. ज्यामध्ये तो म्हणतोय,’मला वाटतं की, मी जो विचार करतो, तो विचार सुद्धा आधी पासून लिहीलेला असतो.’

या ट्रेलरच्या पुढे तो एका व्यक्तीचा हात बघून त्याच्या जन्म आणि मृत्यूची वेळ सुद्धा सांगतो. ट्रेलरमध्ये प्रभास आणि पुजाच्या प्रेमाचे काही क्षण सुद्धा दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटामध्ये 1970 च्या काळातील झलक सुद्धा दिसून येईल.

- Advertisement -

चित्रपटातील काही सीन्स युरोपमध्ये शुट केलेले आहेत. 300 करोड बजेट असलेल्या राधेश्याम चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभास आणि पुजा हेगडे यांसह सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, साशा छेत्री हे सुद्धा दिसून येतील. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री भाग्याश्री सुद्धा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.


हेही वाचा – Jhund : आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा नागराजने फुटबॉल बनवला, झुंड पाहिल्यानंतर आमिरची पहिली रिअँक्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -