घरताज्या घडामोडीलग्नाच्या १० दिवसांनी Vicky kaushal निघाला शुटींगला

लग्नाच्या १० दिवसांनी Vicky kaushal निघाला शुटींगला

Subscribe

लग्नाला दहा दिवस होताच विक्की कौशल सिनेमाच्या शुटींगला रवाना झाला

राजस्थानमध्ये झालेल्या शाही विवाह सोहळ्यानंतर बॉलिवूडचे विक्की (Vicky Kaushal ) आणि कतरिना (Vicky kaushal ) हे नवे जोडप मुंबईत परतले आहेत. मुंबईत येताच दोघेही कामाला लागले आहेत. लग्नानंतर त्वरित राहिलेली काम करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. लग्नाला दहा दिवस होताच विक्की कौशल सिनेमाच्या शुटींगला रवाना झाला. विक्कीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीय. विक्कीने पोस्टमध्ये स्वत:चा फोटो शेअर करत ‘पहिली कॉफी नंतर शुटींग’ असे म्हटले आहे. यावरुन विक्की ने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

- Advertisement -

विक्की कौशलच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी मात्र विक्कीच्या पोस्टवर कमेंट करत ‘कतरिना भाभी कुठे आहे?, वहिनींशिवाय विक्की ऐकटनेच शुटींगला जाणार का?’ असे असंख्य प्रश्न विचारले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार विक्की आणि कतरिना लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. दोघेही एका जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे विक्की नक्की कोणत्या शुटसाठी जात आहे असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना पडला आहे.

विक्की कौशल मेघना गुलझार दिग्दर्शीत सॅम बहादूर या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्यावर हा सिनेमा आधारित असणार आहे. सिनेमात विक्की कौशल सॅम मानेकशॉ यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. सॅम बहादूर सिनेमा व्यतिरिक्त विक्की कौशल शहीद उधम सिंह या सिनेमातही दिसणार आहे. त्याचप्रमाणे द इम्पोर्टल अश्वत्थामा या सिनेमातही विक्की कोशल मुख्य भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vicky-Katrina लग्नानंतर पहिल्यांदाच करणार एकत्र काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -