घरमनोरंजन"द फॅमिली मॅन2"चा ट्रेलर पाहून भडकले खासदार, सिरीज बॅनची केली मागणी

“द फॅमिली मॅन2″चा ट्रेलर पाहून भडकले खासदार, सिरीज बॅनची केली मागणी

Subscribe

"द फॅमिली मॅन 2" सिरिजच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सामंथा अक्किनेनीच्या भूमिकेला विरोध दर्शवत काही दिवसांपूर्वी #ShameOnYouSamantha संपूर्ण दिवस हा टॅग ट्विटर वर ट्रेंड करत होता. 

ओटीटी वर रिलीज होणार्‍या वेब सिरिजने सर्वाधिक मोठ प्रेक्षकवर्ग बनवला आहे. काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षित वेब सिरिज “द फॅमिली मॅन” च्या दुसर्‍या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण “द फॅमिली मॅन 2″ सिरिज विरुद्ध देशमध्ये वातावरण तापत आहे. मनोज बजपेयी  मुख्य भूमिका असणार्‍या वेब सिरिजला बॅंन करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार वाईको यांनी  सिरिज विरोधात आवाज उठवला आहे. वाईको यांनी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जवडेकर यांना  वेब सिरिज विरोधात पत्र लिहून नाराजी व्यक्त करत सिरिजला बॅंन करण्याची मागणी केली आहे. वायको यांनी पत्रात लिहले आहे की,” “द फॅमिली मॅन 2″ सिरिज मध्ये तामिळ लोकांना आतंकवादी आणि आईएसआई एजंट असे दाखवण्यात आले आहे. त्यांचा सबंध पाकिस्तानी लोकांशी आहे असे चित्रित करण्यात आले आहे. तसेच अनेक तामिळ ईलम वरियर्सने आपले बलिदान दिले आहे. आणि या सिरिज मध्ये त्यांचे काम आतंकवादसोबत जोडण्यात आले आहे. अभिनेत्री सामंथा अक्किनेनी हिला आतंकवादीच्या भूमिकेत दिसत आहे. सिरिज मध्ये दाखवण्यात आलेल्या सर्व घटनेमुळे तामिळ लोकांच्या संकृतीचा अपमान झाला आहे. तसेच त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संपूर्ण तमिळनाडू विभागाला या सिरिजला रिलीज करण्यास कडक नाराजगी आणि आपत्ति दर्शवत आहे. तसेच ह्या सिरिजला रिलीज करण्यात येऊ नये. जर सिरिज रिलीज झाल्यास याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागतील ” फिल्म ट्रेंड अॅनलिस्ट सुमित्यांनी राज्यसभा संसद वाईको याचे पत्र. ट्विटर अकाऊंट वर शेअर केले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच “द फॅमिली मॅन 2” शूटिंग खोळंबले होते यानंतर अनेक अडचणी सिरिज समोर उभ्या राहिल्या होत्या. शेवटी या सिरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि आता “द फॅमिली मॅन 2” सिरिजच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सामंथा अक्किनेनीच्या भूमिकेला विरोध दर्शवत काही दिवसांपूर्वी #ShameOnYouSamantha संपूर्ण दिवस हा टॅग ट्विटर वर ट्रेंड करत होता.


हे हि वाचा – Friends: The Reunion, भारतात ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -