घरमनोरंजनऐश्वर्या राय बच्चनच्या ‘पोन्नियिन सेल्वन’चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘पोन्नियिन सेल्वन’चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने जवळपास 4 वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असले तरी प्रेक्षक ऐश्वर्याच्या चित्रपटातील अभिनयासोबतच चित्रपटाच्या कथेचे देखील भरभरून कौतुक करत आहेत.

मणि रत्नम यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘पीएस-1’ चित्रपट नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने जवळपास 4 वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असले तरी प्रेक्षक ऐश्वर्याच्या चित्रपटातील अभिनयासोबतच चित्रपटाच्या कथेचे देखील भरभरून कौतुक करत आहेत. या चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात करोडो रूपयांची कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने जगभरातून 230 कोटींची कमाई केली आहे.

500 कोटींध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण जगभरातून 70 कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 153 कोटी कमावले. तर तिसऱ्या दिवशी 230 कोटी कमावले.

- Advertisement -

भारतीय बॉक्स ऑफिसवरील ‘पोन्नियिन सेल्वन’चा गल्ला

30 सप्टेंबर रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत करोडो रूपयांचा गल्ला जमावला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 36.5 कोटींची कमाई केली तर शनिवारी या चित्रपटाने 34.60 कोटींची कमाई केली. ‘पोन्नियिन सेल्वन’ने दोन दिवसात सर्व भाषांमध्ये 108.05 कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

- Advertisement -

काय आहे चित्रपटाची कथा
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील चोल साम्राज्यावर आधारित आहे. यामध्ये कावेरी नदीचा मुलगा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक होण्यापूर्वीचा राजा चोल बनण्याची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान याने संगीत दिले आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

 


हेही वाचा :

 

ऐश्वर्या रायच्या बिग बजेट ‘पोन्नियिन सेल्वन’चा टीझर आऊट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -