घरमनोरंजनसर्वाधिक करदाता म्हणून आयकर विभागाकडून सन्मानित केल्यानंतर अक्षय कुमारने मानले आभार

सर्वाधिक करदाता म्हणून आयकर विभागाकडून सन्मानित केल्यानंतर अक्षय कुमारने मानले आभार

Subscribe

हा सन्मान देण्यात आला तेव्हा अक्षय कुमार यूकेमध्ये त्याच्या शूटिंग मध्ये व्यस्त होता. आयकर विभागाकडून देण्यात आलेले सन्मानपत्र अक्षयच्या टीमने त्याच्या वतीने स्वीकारला.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे वारंवार चर्चेत असतो. अशातच मागील काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला. यासाठी आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान सुद्धा करण्यात आला होता. अक्षय कुमारचे दरवर्षी ४ ते ५ सिनेमे प्रदर्शित होतात. बॉलिवूड मधील हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता कर भारण्यातही अग्रेसर ठरला आहे. एका रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या पाच वर्षांपासून सर्वाधिक कर भरत आहे आणि म्हणूनच आयकर विभागाने मागील काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला सन्मानपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

मात्र, हा सन्मान देण्यात आला तेव्हा अक्षय कुमार यूकेमध्ये त्याच्या शूटिंग मध्ये व्यस्त होता. आयकर विभागाकडून देण्यात आलेले सन्मानपत्र अक्षयच्या टीमने त्याच्या वतीने स्वीकारला. या सन्मान पत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान, आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी तो म्हणाला की, “आयकर विभागाने माझा सन्मान केला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ही खूप चांगली भावना आहे. तुम्ही जे काही कमावलंय त्यातून तुम्ही देशासाठीही काहीतरी करू शकता ही चांगली गोष्ट आहे.”

- Advertisement -

2015 आणि 2019 मध्ये देखील अक्षय कुमार सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला होता. या काळात तो जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 52 वा अभिनेता ठरला होता. त्यावेळी अक्षय कुमारची संपत्ती ही 386 कोटींच्या आसपास होती. चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड आणि जाहिराती यांमधून देखील अक्षय कुमार करोडो रूपये कमावतो. दरम्यान, अक्षय कुमार त्याच्या एका चित्रपटामागे १०० कोटींचे मानधन घेतो. अक्षय कुमारची विदेशात देखील करोडोंची संपत्ती आहे.


हेही वाचा :ट्रोल करणाऱ्यांना जास्त भाव…आलियाने दिलं ट्रोलर्सला उत्तर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -