घरमनोरंजनट्रोल करणाऱ्यांना जास्त भाव...आलियाने दिलं ट्रोलर्सला उत्तर

ट्रोल करणाऱ्यांना जास्त भाव…आलियाने दिलं ट्रोलर्सला उत्तर

Subscribe

आलिया भट्टने प्रमोशन दरम्यान अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले, त्यावेळी ती ट्रोलिंगबाबत म्हणाली की, मला आता ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी डार्लिंग्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा या चित्रपट ५ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्टसोबत विजय वर्मा आणि शेफाली शाहसुद्धा महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील नवं गाणं ला इलाज मंगळवारी प्रदर्शित करण्यात आलं आहे. याचं दरम्यान, आता आलियाने ट्रोलिंग आणि चित्रपट फ्लॉप होण्यावर भाष्य केलं आहे.

आलिया भट्टला ट्रोलिंगने नाही पडत फरक
आलिया भट्टने प्रमोशन दरम्यान अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले, त्यावेळी ती ट्रोलिंगबाबत म्हणाली की, “मला आता ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही. किती लोक ट्रोल करतात? मला वाटतं आपण ट्रोल करणाऱ्यांना जास्त भाव देतो.” असं आलिया त्यावेळी म्हणाली. तसेच ती ट्रोल झाल्यास तिला काहीही फरक पडत नाही.”

- Advertisement -

चित्रपटांच्या कमाईबाबत आलियाने मांडलं मत

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्टला विचारण्यात आलं की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात किंवा नाही चालत याचा किती प्रभाव पडतो. यावर उत्तर देत आलिया म्हणाली की, “चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मंस खूप प्रभाव टाकतो. आम्हीलोक चित्रपटासाठी खूप मेहनत घेतो आणि विचार करतो की चित्रपट चांगला चालेल. परंतु तसं झालं नाही की खूप वाईट वाटतं.”

- Advertisement -

आलिया भट्टचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण
आलिया भट्ट तिच्या डार्लिंग्स चित्रपटापासून निर्माती म्हणून पदार्पण करत आहे. शाहरूख खानची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट सोबत आलिया भट्ट डार्लिंग्सची निर्मिती करत आहे. येत्या काळात आलियाचा ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सुद्धा दिसून येणार आहे.


हेही वाचा :कंगना रनौतचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिकेवर निशाणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -