घरमनोरंजनअभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

अभिनेत्री अमीषा पटेलच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या विरोधात रांची कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमीषा पटेलवर चित्रपट निर्माते अजय कुमार यांचा अडीच कोटींचा चेक बाउंस केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमीषा पटेल पैसे परत देत नसल्याने अजय कुमार यांनी कोर्टात धाव घेतली होती. ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने निर्मात्याने अमीषाकडे पैशांची मागणी केली. अमीषाने मोठ्या प्रयत्नाने अडीच कोटींचा चेक दिला. परंतु, ज्यावेळी हा चेक बँकेत जमा केला तर तो बाउंस झाला.

काय आहे प्रकरण 

२०१८ साली ‘देसी मॅजिक’ हा चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमीषाला तीन कोटी रुपये दिले होते. त्यानंतर अमीषाकडे ज्या-ज्या वेळी या पैशांची मागणी केली त्या-त्या वेळी तिनं पैसे देण्याऐवजी काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली, असा आरोप अजय कुमार यांनी केला आहे.

- Advertisement -

अमीषा विरोधात फसवणूक केल्याचे आरोप

या चेक बाउंस प्रकरणी अमीषा विरुद्ध रांची कोर्टात पैशांची फसवणूक केल्याचा खटला सुरू आहे. फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत अमीषा हिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिनं एकदाही याला उत्तर दिले नाही. त्यानंतर कोर्टाने तिला अनेक वेळा समन्स पाठवले. पैशांवरून कोर्टात अनेकदा कारवाई करण्यात आली. ३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली अमीषा पटेल ही अभिनेता हृतिक रोशन पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’..या चित्रपटाच्या यशनानंतर चर्चेत आली होती. ती त्या काळी सर्वात नावाजलेली असलेली अभिनेत्री होती. प्रसिद्ध लोकांचे फोटो दाखवून अमीषा पटेल हिने धमकी दिल्याचा आरोपही अजय कुमार यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -