घरमनोरंजनअमिताभ - जया यांचा 'अभिमान' ४५ वर्षांचा

अमिताभ – जया यांचा ‘अभिमान’ ४५ वर्षांचा

Subscribe

अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर एक खास फोटो शेअर करत, 'अभिमान'च्या ४५ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बॉलीवूडच्या मोजक्याच एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. अमिताभ आणि जया यांची जोडी आजवर अनेक सिनेमांमधून आणि जाहिरातींमधून झळकली आहे. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघं एकत्र आलेले पाहायला मिळतात. सध्या पुन्हा एकदा ही सदाबहार जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन नुकतंच ‘अभिमान’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. अभिमान चित्रपटाला ४५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी आपल्या चाहत्यांसाठी हे खास फोटो कोलाज शेअर केलं आहे. अमिताभ आणि जया यांचे फोटो असलेल्या या कोलाजमधील, त्यांचा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो विशेष लक्षवेधी आहे.

चाहत्यांची भरभरुन पसंती

अमिताभ आणि जया यांच्या या ब्लॅक अँड व्हाईट फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांची भरभरुन पसंती मिळते आहे.  त्या दोघांच्या तरुणपणीचा हा फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा आहे. हे चारही फोटो अभिमान चित्रपटातीलच चार वेगवेगळी दृष्य आहेत. ‘अभिमान’ चित्रपट २७ जुलै १९७३ साली रिलीज झाला होता. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अभिमान चित्रपटात अमिताभ आणि जया यांच्यासह बिंदु, दुर्गा खोटे, ए के हंगल आणि असरानी या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

बिग बी आहेत बिझी

अमिताभ बच्चन सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या आगामी ‘ब्रम्हास्त्र‘ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच आलिया भट, रणबीर कपूर आणि नागार्जुन यांचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले होते. तर दुसरीकडे अमिर खानसोसबतच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान‘ या चित्रपटाचंही ते शूटिंग करत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर पूर्वीच रिलीज झालं आहे. याशिवाय बिग बी सध्या ‘बदला‘ चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त असल्याचं समजतंय. या चित्रपटात अमिताभसोबत अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -