घरमनोरंजनअमिताभ बच्चन रमले सुपरहिट चित्रपटांच्या आठवणीत, म्हणाले... आता OTT प्लॅटफॉर्मकडून लाखो यशाचे...

अमिताभ बच्चन रमले सुपरहिट चित्रपटांच्या आठवणीत, म्हणाले… आता OTT प्लॅटफॉर्मकडून लाखो यशाचे आलेख निर्मिती

Subscribe

सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या चित्रपटाचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या करीयरची सुरुवात  ७० च्या दशका पासून केली होती. बॉलीवूड मध्ये करीयरच्या सुरूवातीला अनेक चढ- उतार त्यांनी अनुभवले आहेत. बिग बी हे सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव असतात. ते अनेकदा या माध्यमातून आपल्या आगामी प्रोजेक्ट विषयी,आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतांना दिसतात नुकतच बिग बी यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या चित्रपटाचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. आणि त्याला कॅप्शन देत लिहल आहे की ”१९७० च्या दशकातील काळ जेव्हा ५० आणि १०० आठवड्याच्या अंतराने चित्रपट प्रदर्शित होत असे. डॉन,कसमे वादे, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, गंगा की सौगंध आणि इतर काही चित्रपट ५० आठवड्यांपेक्षा जास्त  दिवस चित्रपटगृहात गाजली, आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म हे लाखो यशाचे आलेख तयार करत आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे चित्रपटसृष्टीतिल कामकाज अनेक दिवस ठप्प झाले होते. तसेच चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्यात आल्यामुळे दिग्दर्शक,निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आपली पाऊले ओटीटी प्लॅटफॉर्म कडे वळवली. महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘गुलबो सीतबो’ हा सिनेमा सुद्धा ओटीटी वर प्रदर्शित करण्यात आला होता. कोरोना व्हायरसच्या वाढत्या कहरामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने यादरम्यान आपली मुळे घट्ट केली आहेत. अनेक बिग स्टारर तसेच बिग बजेट चित्रपट ओटीटी वर रिलीज केली जात आहेत.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर, ‘कट्यार काळजात घुसलीनंतर’ दिग्दर्शक सुबोध भावेचा नवा संगीतमय चित्रपट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -