घरट्रेंडिंगकला दिग्दर्शक राजू सापते यांची पुण्यात आत्महत्या, युनियन कडून मानसिक जाच

कला दिग्दर्शक राजू सापते यांची पुण्यात आत्महत्या, युनियन कडून मानसिक जाच

Subscribe

राजू सापते यांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांना काही गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे आयुष्य संपवत असल्याचे म्हंटलं आहे.

मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कला दिग्दर्शक राजू सापते (Raju sapte)यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आत्महत्या केली आहे. राजू सापते यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. राजू सापते यांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांना काही गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे आयुष्य संपवत असल्याचे म्हंटलं आहे. (Art Director Raju Sapte Comitted Sucide at Pune due to Mental Harrasment). राकेश मौर्या यांनी दिलेल्या त्रासामुळे राजू सापते यांनी आत्महत्या केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. मी संपूर्ण विचारपूर्वक आत्महत्येचा निर्णय घेत आहे. लेबर युनियनमधील राकेश मौऱ्या यांच्या जाचाला वैतागून राजू सापते यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सांगितले आहे. तसेच राजू सापते यांचे कोणत्याही प्रकारचे पेमेंट प्रोड्युसर असोसिएशन युनियनमध्ये थकित नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. राजू सापते यांनी पुढे म्हंटलं आहे की, त्यांच्याजवळ 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम त्यांना तत्काळ सुरु करायचे होते. त्यातलं एक प्रोजेक्ट त्यांना सोडून द्यावं लागलं. कारण युनियन कडून मानसिक जाच सहनं करावा लागत आहे. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी आज आत्महत्या करत असल्याचे स्पष्टं केलं आहे. तसेच  मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं व्हिडिओमध्ये राजू सापते म्हणाले आहेत. राजू सापते यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.



हे हि वाचा – ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार प्राप्त कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -