घरमनोरंजनअवधूत, श्रेयसचा दुबईमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट

अवधूत, श्रेयसचा दुबईमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट

Subscribe

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018. याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्ट मध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्याचा समावेश असणार आहे. सोबतच या गाण्यांना थोडा ‘फ्युजन टच’ देखील असेल. या जल्लोष 2018 शो चे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठी मधील पहिले रॅपर किंग जे डी म्हणजेच श्रेयस जाधव. अवधूत गुप्ते हे त्याच्या गाण्यांसोबतच झेंडा, मोरया यासारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील ओळखले जातात. तर दुसरीकडे श्रेयस जाधव हे मराठीतील पहिले रॅपर आहे. रॅपर म्हणून श्रेयस त्यांची अनेक गाजलेली गाणी आहे.

पण याशिवाय त्यांची वेगळी ओळख म्हणजे त्यांनी मराठीत अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या दोन दिग्गज गायकांना एकाच स्टेजवर परफॉर्म करताना पाहण्याची अनोखी संधी दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. या सर्व गोष्टींमध्ये अजून एक सरप्राईझ पॅकेज म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी स्पृहा जोशी हिचे धमाकेदार सूत्रसंचालन. संगीताला भाषेचे बंधन नसते. म्हणूनच तर दुबईमध्ये होणार्‍या मराठी मातीचा गंध असलेल्या या शो बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचमुळे शो च्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतोय. येत्या 21 डिसेंबरला होणारा हा भव्य शो गणराज असोसिएट्स, मिराकी इव्हेंट्स आणि मोरया इव्हेंट्सच्या सहयोगाने सादर करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -