घरमनोरंजनअभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीला निर्मात्याकडून अश्लील वेबसाइटवर फोटो व्हायरल करण्याची धमकी

अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीला निर्मात्याकडून अश्लील वेबसाइटवर फोटो व्हायरल करण्याची धमकी

Subscribe

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी सध्या प्रचंड चर्चेत आहे. आगामी काळा तिचा ‘शिबपूर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी स्वस्तिकाने या चित्रपटाच्या सह-निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या सह-निर्मात्याचं नाव संदीप सरकार असून त्याने स्वस्तिकाला धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे.

स्वस्तिकाने सांगितलं की, “संदीप आणि त्याच्या काही साथीदारांनी मला धमकीचे अनेक मेल पाठवले आहेत, तसेच तिच्या फोटोंची छेडछेड करून अश्लील वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे.”

- Advertisement -

पुढे स्वस्तिका म्हणाली की, “संपूर्ण शूटिंग आणि डबिंग दरम्यान माझी आणि संदीप सरकारशी कधीच ओळख झाली नाही. आणखी एक सह-निर्माता अजंता सिन्हा रॉय आमच्याशी बोलायचे, पण अचानक संदीप सरकार यांनी मला धमकीचे ईमेल पाठवायला सुरुवात केली. इतकेच नाही तर, तिने हे देखील सांगितले की, संदीपने दावा केला होता की तो अमेरिकन नागरिक आहे आणि जर तिने टीमला सहकार्य केले नाही तर तिला कधीही यूएस व्हिसा मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी तो यूएस कॉन्सुलेटशी बोलेल. तेव्हापासून स्वस्तिकाने चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेणे बंद केले.”

ईस्टर्न इंडिया मोशन पिक्चर्स असोसिएशनशी साधला संपर्क

याप्रकरणी स्वस्तिका मुखर्जीने कोलकाता येथील गोल्फ ग्रीन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याशिवाय तिने ईस्टर्न इंडिया मोशन पिक्चर्स असोसिएशनकडेही मदत मागितली आहे. स्वस्तिकने या सर्व धमकीच्या ईमेलच्या स्कॅन कॉपी जमा केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

atrocity case: सोनाक्षी सिन्हाच्या वक्तव्याचा होणार फेरतपास; बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -