घरताज्या घडामोडीDonald Trump Case : 'Not Guilty'; निवेदन जारी करत ट्रम्प यांचा हल्लाबोल,...

Donald Trump Case : ‘Not Guilty’; निवेदन जारी करत ट्रम्प यांचा हल्लाबोल, म्हणाले…

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स (Stormy Daniels) हिला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मॅनट्टन कोर्टात आज सुनावणी होती. या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प कोर्टात हजर झाले. पण कोर्टात हजर होताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व प्रकरानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी 'Not Guilty' असे म्हणत स्वतः निर्दोष असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स (Stormy Daniels) हिला गुप्तपणे पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मॅनट्टन कोर्टात आज सुनावणी होती. या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प कोर्टात हजर झाले. पण कोर्टात हजर होताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व प्रकरानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘Not Guilty’ असे म्हणत स्वतः निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. तसेच, न्यायालयातील हजेरीनंतर जाहीर निवेदन जारी केले. त्यावेळी ‘अमेरिकेत असं काही घडू शकते, असं मला कधीच वाटलं नव्हतं. निर्भयपणे माझ्या देशाचे रक्षण करणं हा एकमेव गुन्हा मी केला आहे. आपला देश नरकात जातोय’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. (us former president Donald trump public remarks after arriving his Florida home from new york court)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलांसह याचिका दाखल करताच न्यायालयात हात जोडून बसले. या आरोपांबद्दल त्यांना काय म्हणायचे आहे, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ‘Not Guilty’. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले किंवा माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी खटल्याचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

याशिवाय, हे खोटं प्रकरण केवळ आगामी 2024 च्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी समोर आणण्यात आलं असून ते तात्काळ हटवण्यात यावं, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर निशाणा साधताना म्हटले. तसेच, समर्थकांच्या जमावाने त्यांच्या समर्थनार्थ टाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावरील कारवाई हे राजकीय षडयंत्र आहे, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ट्रम्प यांनी ‘न्यायमूर्ती जुआन मार्चेन यांना ट्रम्प यांचा द्वेष करणारे न्यायाधीश म्हणून संबोधलं आहे. तसेच न्यायाधीशांची मुलगी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासाठी काम करत आहेत’, असे म्हणत न्यायाधिशांवरही निशाणा साधला.

हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचे आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने 130,000 US डॉलर्सचे पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

- Advertisement -

याप्रकरणासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात स्वतः निर्दोष असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणे चुकीची असल्याचेही सांगितले. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) न्यायालयातून बाहेर पडले.


हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने ठोठावला 1.22 लाख डॉलरचा दंड; पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -