घरमनोरंजन‘द कपिल शर्मा’ शोमधून भारती सिंहची एक्झिट

‘द कपिल शर्मा’ शोमधून भारती सिंहची एक्झिट

Subscribe

आता या कार्यक्रमातून कॉमेडी क्वीन भारती सिंह देखील बाहेर पडणार असल्याची बातमी समोर येत आहे. भारती हा कार्यक्रम नक्की का सोडणार आहे याचे कारण देखील समोर आले आहे.

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय रियालिटी शो ‘द कपिल शर्मा’ येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. 10 सप्टेंबर पासून हा शो टेलिव्हिजनवर दाखवला जाईल. या कार्यक्रमाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या शोची वाट पाहत आहेत. ‘द कपिल शर्मा’ शोचा हा चौथा सीझन असून यामध्ये यावेळी अनेक नव्या कलाकारांची भर पडणार आहे. मात्र, या नव्या सीझनमध्ये कार्यक्रमातील जुने कलाकार कार्यक्रमातून बाहेर पडत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता या कार्यक्रमातून कॉमेडी क्वीन भारती सिंह देखील बाहेर पडणार असल्याची बातमी समोर येत आहे. भारती हा कार्यक्रम नक्की का सोडणार आहे याचे कारण देखील समोर आले आहे.

भारती नसणार ‘द कपिल शर्मा’ शोचा भाग
मागील काही दिवसांपासून कॉमेडीयन कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामध्ये काही बिनसलं असल्याची अफवा समोर आली होती. आता भारती देखील हा कार्यक्रमाचा भाग नसणार हे कळताच तिचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र भारतीने सांगितले की, तिला सध्या ‘द कपिल शर्मा’शो मधून दिला ब्रेक हवा आहे. कारण ती सध्या दुसऱ्या शोचे निवेदन करण्यामध्ये व्यस्त आहे.

- Advertisement -

‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार ‘हे’ नवे 5 कलाकार
‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात गौरव दुबे, इश्तियाक खान, श्रीकांत जी मस्की, सृष्टी रोडे, सिद्धार्थ सागर हे पाच कलाकार नव्या पर्वात दिसून येतील.

कृष्णा अभिषेकने का सोडला कार्यक्रम?
‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये कृष्णा साकारत असलेली सपनाच्या भूमिकेने सगळ्यांना खळखळून हसवले. मात्र, या नव्या पर्वात सपना ही भूमिका साकारणारे कृष्णा दिसणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत. या शोमधून बाहेर पडण्यामागचे कारण कृष्णा अभिषेकने सांगितले. खरंतर, या शोच्या करारातील समस्यांमुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्यक्रमाशी संबंधीत एका व्सक्तीने सांगितले की, या शोचे निर्माते आणि कृष्णाने सर्व गोष्टी ठिक करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु आर्थिक व्यवहारामुळे कृष्णाने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

‘पल्याड’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -