घरमनोरंजनVideo: अनुप जलोटांसोबत 'तिचा' रोमँटिक डान्स

Video: अनुप जलोटांसोबत ‘तिचा’ रोमँटिक डान्स

Subscribe
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १२’ या रिअॅलिटी शोची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. आधीच्या ११ सिझनप्रमाणेच बीग बॉसच्या या सिझनलाही तितकीच लोकप्रियता मिळते आहे. मात्र, बीग बॉसचे चाहते खऱ्या अर्थाने उत्सुक असतात ते  ‘वीकेण्ड का वार’ पाहण्यासाठी. यंदाच्या ‘वीकेण्ड का वार’चा एपिसोड काहीसा खास असणार आहे, कारण या वीकेंडला अभिनेता गोविंदा त्याच्या ‘फ्राय डे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. याशिवाय लाफ्टर क्वीन- भारती सिंह हीदेखील सलमान खानसोबत घरात एंट्री घेणार आहे. भारती सिंह सलमानसोबत वीकेण्ड का वार एपिसोडचं होस्टिंग करणार आहे. सूत्रांनुसार, भारती घरातील स्पर्धकांना कठीण कठीण टास्कही देणार आहे. मात्र, हास्यवीर भारती सिंह म्हटलं की धमाल, मजा-मस्ती आणि हास्याचे फवारे आलेच. या एपिसोडमध्येही भारतीने अशीच काही कमाल केली आहे. बीग बॉसचे स्पर्धक अनुप जलोटासोबत भारतीने एक रोमँटिक डान्स केला असून, त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ कलर्स वाहिनीने सध्या व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा पेंडसेचा हॉट पोल डान्स आणि जसलीनच्या ग्लॅमरस अदाही पाहायला मिळत आहे.

‘बीग बॉस’ची बहुचर्चित जोडी 

गायक अनुप जलोटा आणि त्याची गर्लफ्रेंड जसलीन मथारो ही बीग बॉसच्या १२ व्या सिझनमधील बहुचर्चित जोडी आहे. अनुप जलोटा हे ६५ वर्षांचे तर जसलीन ही केवळ २८ वर्षाची असल्यामुळे ही जोडी घरात आल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा आपल्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असलेल्या जसलीनसोबत गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. आजपर्यंत या दोघांनी लपवून ठेवलेलं आपलं नातं अखेर बीग बॉसच्या घरात सर्वांसमोर मान्य केलं. मध्यंतरी शोदरम्यान या जोडप्यामध्ये खटकेही उडाले, त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही रंगल्या पण पुन्हा एकदा हे दोघं एकत्र आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -