घरताज्या घडामोडीविद्या बालनने मंत्र्यासोबत 'डिनर' करण्यास दिला नकार

विद्या बालनने मंत्र्यासोबत ‘डिनर’ करण्यास दिला नकार

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या मध्यप्रदेशमध्ये आपल्या नवा चित्रपट ‘शेरनी’चे शूटिंग करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती एका जंगलात काही सीन शूट करत आहे. परंतु या चित्रपटाचे शूटिंग अचानक बंद केले आहे. शूटिंग बंद करण्याचे कारण मध्यप्रदेशचे वनमंत्री विजय शाह असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार विद्या बालनला विजय शाह यांना आपल्यासोबत डिनर करण्यासाठी बोलावले होते. पण विद्या बालनने डिनरला जाण्यास नकार दिला. यानंतर विद्या बालनच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माती टीमची गाडी शूटिंगसाठी जंगलात जात होती. पण त्यांना शूटिंगसाठी जंगलात जाण्यास मनाई केली. बालाघाटच्या जिल्हा वन अधिकारीने निर्मात्या टीमच्या गाड्या जंगलात जाण्यास रोखले आणि सांगितले की, फक्त दोन गाड्या जाण्यास परवानगी आहे.

- Advertisement -

दरम्यान मध्यप्रदेशचे वनमंत्री विज शाह यांनी हे आरोप फेटाळले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांनी स्वतः डिनर आणि लंच जाण्यास नकार दिला. विजय शाह म्हणाले की, ‘ज्या लोकांनी शूटिंगसाठी परवानगी मागितली आहे. मी त्या लोकांसाठी बालाघाट येथे उपस्थित होतो आणि त्यांनीच मला डिनर आणि लंचसाठी बोलावले. पण मी त्यांना सांगितले, सध्या शक्य नाही.’

पुढे विजय शाह म्हणाले की, ‘मी जेव्हा महाराष्ट्रात जाऊन तेव्हाच त्यांना भेटेन. डिनर आणि लंचला मी नकार दिला होता, पण शूटला नाही.’ यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग थांबले होते. यावेळेस अभिनेता विजय राजने शूटिंग दरम्यान सेटवर एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महिलेने विजय राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी विजय राजला याप्रकरणी अटक केली आणि आता त्याला जामीनावर बाहेर सोडले आहे. विजय सध्या मुंबईत असल्याने तो शूटिंगवर नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लवकरच ‘अपने २’चा सिक्वल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -