घरमनोरंजन‘द काश्मीर फाइल्स'च्या यशात भाजपाचा हात? विवेक अग्निहोत्री झाले व्यक्त

‘द काश्मीर फाइल्स’च्या यशात भाजपाचा हात? विवेक अग्निहोत्री झाले व्यक्त

Subscribe

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया देत म्हणाले की, "ज्यावेळी द काश्मिर फाईल्स सारख्या चांगल्या विषयाचे कमी बजेटमधील चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्या चित्रपटाला विरोध केला जातो, त्यावेळी कोणीही त्या चित्रपटांची पाठराखण करत नाही.

सध्या बॉलिवूडमधील प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्श ऑफिसवर भरघोस कमाई करण्यात असफल ठरत आहेत. एकानंतर एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत परंतु प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यास पसंती दर्शवत नाहीत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता या चित्रपटांमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांबाबत चिंता सतावत आहे. दरम्यान, नुकतेच अभिनेत्री करीना कपूर हिने सोशल मीडियावरून लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. करीनाच्या याचं आवाहनाला उत्तर देत चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया देत म्हणाले की, “ज्यावेळी द काश्मिर फाईल्स सारख्या चांगल्या विषयाचे कमी बजेटमधील चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्या चित्रपटाला विरोध केला जातो, त्यावेळी कोणीही त्या चित्रपटांची पाठराखण करत नाही. ज्यावेळी चित्रपटसृष्टीतील स्वतंत्र चित्रपट निर्माते कमी बजेटचा चित्रपट तयार करतात तेव्हा बॉलिवूड माफिया त्या चित्रपटांवर बहिष्कार टाकतात. ते चित्रपट मल्टिप्लेक्सवरून काढले जातात. त्यावेळी चित्रपटासाठी कष्ट घेणाऱ्या 250 गरीबांचा विचार कोणीच का करत नाही.” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, यावेळी ते म्हणाले की,”द काश्मिर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी भाजपा पक्षाने त्यांची मदत केली. असं अनेकांना वाटतं परंतु या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्हाला भाजपा ने कोणतीही मदत केलेली नाही. आम्ही आमच्या चित्रपटाचे प्रमोशन स्वतः केले आहे. 2021 च्या नोव्हेंबर पासून आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात केली होती. चित्रपटाच्या सत्यकथेमुळे या चित्रपटाला उत्तम यश मिळालं.”

‘द काश्मिर फाईल्स’ने जमावला कोटींचा गल्ला
काश्मीरी पंडितांच्या संघर्षावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटीहून अधिक कमाई केली होती. अनुपम खेर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, मृणाल जोशी, पल्लवी जोशी हे सुद्धा होते.

- Advertisement -

 

हेही वाचा :दीपिका-रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केली 22 कोटींचा आलिशान बंगला; गृह प्रवेशाचे फोटो केले शेअर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -