घरमनोरंजनदीपिका-रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केली 22 कोटींचा आलिशान बंगला; गृह प्रवेशाचे फोटो केले...

दीपिका-रणवीरने अलिबागमध्ये खरेदी केली 22 कोटींचा आलिशान बंगला; गृह प्रवेशाचे फोटो केले शेअर

Subscribe

रणवीर आणि दीपिकाने या संपत्तीसाठी 22 कोटींचा खर्च केला आहे. याव्यतिरिक्त दोघांनीही संपत्तीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 1.32 कोटींचा खर्च केला आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी शुक्रवारी त्यांच्या अलिबागमधील नव्या घरामध्ये गृह प्रवेश केला. यासंबंधीत फोटो रणवीर आणि दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांचे हे घर मुंबईपासून जवळपास 90 किमी लांब समुद्र किनाऱ्याजवळ स्थित आहे. रणवीर आणि दीपिकाने हे घर गेल्या वर्षी खरेदी केलं होतं.

22 कोटींची आहे संपत्ती

- Advertisement -


मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि दीपिकाने या संपत्तीसाठी 22 कोटींचा खर्च केला आहे. याव्यतिरिक्त दोघांनीही संपत्तीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी 1.32 कोटींचा खर्च केला आहे. ही संपत्ती अलिबाग जवळील मपगावमध्ये आहे जी, 9000 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, याआधी जुलै 2021 मध्ये दीपिकाने बंगळुरूमध्ये देखील एक महागड घर खरेदी केलं आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये देखील खरेदी केली 119 कोटींची संपत्ती
मागील काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने एक नवीन घर खरेदी केलं होतं. मात्र या अर्पाटमेंटचे अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही. त्यांनी ज्या अपार्टमेंटची बोलणी केली आहे, तिथून अरबी समुद्राचे सुंदर दृष्य पाहता येतं.रणवीर सिंहने हे घर 119 कोटींना खरेदी केलेलं आहे. इतकंच नव्हे तर ही अपार्टमेंट शाहरूख खानचा मन्नत आणि सलमान खानचा गॅलेक्सी बंगल्याच्या मध्यावर आहे.

या चित्रपटात दिसणार दीपिका
अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा लवकरच ‘फायटर’च्या चित्रीकरणासाठी सुरूवात करणार आहे. ‘फायटर’ चित्रपटाला भारतातली पहिला ऍक्शन चित्रपट असल्याचे म्हणटले जात आहे. ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ नंतर ऋतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंदचा हा तिसरा चित्रपट आहे.‘फायटर’ पुढच्या वर्षीच्या ऑक्टोंबर पर्यंत रिलीज होणार आहे.


हेही वाचा :धर्मवीर आनंद दिघेंच्या दहीहंडीत श्रद्धा कपूरची हजेरी; मराठमोळ्या अंदाजात म्हणाली..

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -