‘The Big Picture शो’मधून रणवीर सिंग छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज

ranveer singh
अभिनेता रणवीर सिंग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग छोट्या पडद्यावरून लवकरच पदार्पण करणार आहे. ‘The Big Picture शो’च्या माध्यमातून रणवीर त्याचे हे पदार्पण करण्यास सज्ज आहे. असे सांगितले जात आहे की, कलर्स टीव्हीच्या गेम शो द बिग पिक्चरद्वारे रणवीर सिंग छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. नुकतीच रविवारी, बिग बॉस 15 मध्ये गेम शोच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली. शोचा प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे. इतकेच नाही तर रणवीर सिंह आता बॉलिवूड कलाकारांमध्ये सहभागी झाला असून तो आता चित्रपटांसह छोट्या पडद्यावर आपली अनोखी स्टाईल प्रेक्षकांना दाखवताना दिसणार आहे.

बिग पिक्चर हा एक गेम शो आहे जो स्पर्धकांच्या जनरल नॉलेजची तसेच पिक्टोरियल मेमोरीची चाचणी घेताना दिसणार आहे. स्पर्धकांना १२ चित्र आणि दृश्यात्मक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. योग्य उत्तर देणाऱ्याला बक्षीस स्वरूपी रक्कम दिली जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हा गेम पार्टनर्ससह खेळू शकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

द बिग पिक्चर हा शो १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून दर शनिवार आणि रविवारी प्रसारित केला जाणार आहे. या शोचे प्रसारण बिग बॉस १५ कार्यक्रमाच्या आधी रात्री ८ वाजता असणार आहे. रविवारी सलमान खानने रणवीर सिंहला बिग बॉस १५ च्या प्रिमीअर एपिसोडमध्ये लाँच केल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान रणवीर सिंह छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास देखील सज्ज आहे. नाताळच्या मुहूर्तावर रणवीरची फिल्म ८३ चित्रपटगृहात २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.