घरताज्या घडामोडीValentine Day: अर्जुनच्या मिठीत बेधुंद झाली मलायका, पाहा रोमँटिक फोटो

Valentine Day: अर्जुनच्या मिठीत बेधुंद झाली मलायका, पाहा रोमँटिक फोटो

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित कपल म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor). या दोघांचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आज ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s Day) निमित्तानेही मलायकाने एक रॉमँटिक फोटो शेअर केला असून त्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मलायकाने अर्जुनसोबत एक रोमँटिक फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. (Malaika Arora dedicated a Valentine’s Day post to Arjun Kapoor)

मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जुनच्या मिठीत असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पाहू शकता की, मलायका डोळे बंद करून अर्जुनच्या मिठीत बेधुंद झाली आहे. आणि अर्जुन मलायकाच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. मलायकाने हा फोटो शेअर करत ‘माझा’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला आहे. तर अर्जुन कपूर ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे पायजामामध्ये दिसत आहे. दोघांचा हा रोमँटिक आणि कँडिड म्युमेंट चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडत आहे. मलायकाच्या या रोमँटिक फोटोवर बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने  Aww अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महीप कपूर, राहुल खन्ना, गायिका लिसा मिश्राने दोघांना क्यूट म्हटले आहे.

दरम्यान मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जरी लोकांमध्ये दोघं एकमेकांबद्दल कमी बोलत असले तरी इन्स्टाग्रामवरून दोघांनी आपले नाते अधिकृत केले होते. कधी दोघं एकत्र पार्टी करताना तर कधी व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. बॉलिवूडच्या इतर कपलप्रमाणे मलायका आणि अर्जुनच्या देखील ब्रेकअपच्या अफवा पसरल्या जातात. परंतु दोघेही हे फेटाळतात.

- Advertisement -

हेही वाचा – रोहनप्रितने दिलं नेहा कक्करला खास Valentine सरप्राइज ! सगळ्यांसमोर नवऱ्याला केलं किस


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -