घरमनोरंजनचिरंजीवी आणि सलमान खानच्या 'गॉडफादर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

चिरंजीवी आणि सलमान खानच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Subscribe

'गॉडफादर' चित्रपट येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि सलमान खान व्यतिरिक्त अभिनेत्री नयनतारा आणि सत्य देव सुद्धा असणार आहे.

टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गॉडफादर’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानची देखील एक खास भूमिका असणार आहेत. काही दिवसांपूर्वी चिरंजीवी आणि सलमान खानवर चित्रीत करण्यात आलेलं गाणं ‘थारा मार’ प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की, अभिनेता चिरंजीवीने चित्रपटात ब्रह्मा ही भूमिका साकारली आहे. यामध्ये तो एक राजकारणी आहे आणि त्याचे अनेक शत्रू आहेत. त्यानंतर यामध्ये सलमान खानची एन्ट्री होते. जो चित्रपटामध्ये चिरंजीवीचा मोठा भाऊ आहे. हा कमाल ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडल आहे.

- Advertisement -

5 ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित

- Advertisement -

‘गॉडफादर’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिरंजीवी आणि सलमान खान व्यतिरिक्त अभिनेत्री नयनतारा आणि सत्य देव सुद्धा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने, चिरंजीवीच्या या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतही मानधन घेतलेलं नाही. चिरंजीवीने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं की, तो आणि सलमान चांगले मित्र आहेत. दोघांची मैत्री एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली. मुंबईमध्ये गेल्यावर तो सलमानच्या घरीच थांबतो.

या चित्रपटांमध्ये देखील दिसणार सलमान खान
‘गॉडफादर’ चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘Tiger 3’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल. या व्यतिरिक्त तो शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटात देखील दिसेल.


हेही वाचा :

‘टीडीएम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -