घरमहाराष्ट्रमेधा सोमय्या बदनामी प्रकरण, संजय राऊतांविरोधातील याचिकेवर १ नोव्हेंबरपासून होणार सुनावणी

मेधा सोमय्या बदनामी प्रकरण, संजय राऊतांविरोधातील याचिकेवर १ नोव्हेंबरपासून होणार सुनावणी

Subscribe

बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुंबई –भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी शिवडी न्यायालयात आज सुनावणी होती. मात्र, याप्रकरणी १ नोव्हेंबरपासून नियमित सुरू केली जाईल, असे आदेश शिवडी न्यायालयाने दिले आहेत, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळे याप्रकरणात संजय राऊत सहिसलामत सुटतात की त्यांच्यावर कारवाई होते हे पाहावं लागेल.


संयज राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा  मेधा सोमय्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांना न्यायालयाचे समन्स, किरीट सोमय्यांची माहिती

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हा दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे हजर राहता आले नाही. आणि आता ईडीच्या कोठडीत असल्याने हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे याप्रकरणी काय होतंय हे पाहावं लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -