घरमनोरंजनकोरियोग्राफर रेमो डिसूझाही वर्णभेदाचा शिकार

कोरियोग्राफर रेमो डिसूझाही वर्णभेदाचा शिकार

Subscribe

आतापर्यंत अनेक कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे.

सिनेसृष्टीतील वर्णभेद हा मुद्दा नवीन नाही. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर नाव कमावणार्‍या कलाकारांनाही अनेकदा वर्णभेदाला सामोरे जावे लागल्याचे अनुभव आपण ऐकतो. अनेक कलाकार यावर मोकळेपणाणे व्यक्तही झालेत. यात आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाने ही वर्णभेदावर आपला अनुभव सांगितला आहे, केवळ सिनेसृष्टीत नाही. तर अगदी लहानपणापासून त्याला वर्णव्देषाचा त्रास सहन करावा लागल्याचे त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
मला अगदी लहान असल्यापासून वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. मला लोक माझ्या रंगावरुन कायम चिडवायचे, माझ्या रंगावर भाष्य करायचे. पण, त्यांच्याकडे मी कधीच लक्ष दिले नाही. फक्त माझ्या कामावर मी लक्ष केंद्रित करत होतो. पण, आजही आपल्या देशात वर्णद्वेष केला जातो हे सत्य असल्याचेही रेमो म्हणाला.

बॉलिवूडमधील सर्वोकृष्ट नृत्यकारांपैकी एक म्हणजे कोरियोग्राफर रेमो डिसूझा (Remo D’Souza). रेमो आज कोरियोग्राफरसोबतच एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. आज मेहनतीच्या जोरावप रेमोने बॉलिवूडमधील आपले स्थान भक्कम केले आहे. सांगायचं झालं तर गेल्या वर्षी रेमोला ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे. 1995 साली ‘बॉलीवूड ड्रीम्स’ (Bollywood Dreams) चित्रपटाच्या माध्यमातून कोरियोग्राफर म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -