घरक्रीडाIND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा सरावाला सुरुवात; 'या' कसोटीत खेळण्याची...

IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा सरावाला सुरुवात; ‘या’ कसोटीत खेळण्याची शक्यता 

Subscribe

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुन्हा नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे तीन कसोटी सामने, तसेच इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली. परंतु, आता शमीने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) पुन्हा सराव करण्यास सुरुवात केली आहे. त्याने नुकताच नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वाढली आहे.

मनगटाला झालेली दुखापत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अ‍ॅडलेड येथे झाला होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टाकलेला शॉर्ट बॉल त्याच्या मनगटाला लागला होता. त्यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळू शकला नाही. तसेच त्याने भारतात परत येत दुखापतीवर उपचार घेतले. शमी आता दुखापतीतून सावरत असून त्याने नुकताच नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला.

- Advertisement -

हेही वाचा – कुलदीपचं घोडं अडतंय कुठं?


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -