घरताज्या घडामोडीसई, ललितचा 'कलरफुल' अंदाज; चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच

सई, ललितचा ‘कलरफुल’ अंदाज; चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच

Subscribe

‘कलरफुल’ सिनेमा लवकरच येणार भेटीस.

मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे रसिकांना चित्रपटगृहांपासून लांब राहावे लागले. काही महिने चित्रपटगृहांचा अनुभव न घेतलेल्या प्रेक्षकांना २०२० वर्षाने जाता जाता अनलॉकचे गिफ्ट दिले. कोरोनाचा बसलेला हा विळखा जसा कमी व्हायला लागला तस तशी मनोरंजनसृष्टी चालू झाली आणि आता नवनवीन मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा, घोषणांचा सिलसिला सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय सुंदर आणि रंगीन नाव असणारा हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ जुलैला प्रेमाच्या पावसाने चिंब भिजवायला हा सिनेमा येत आहे.

- Advertisement -

सई आणि ललितची अतिशय मोहक जोडी

‘कलरफुल’चे नवीन पोस्टर प्रेमाच्या महिन्यात अतिशय सुखद अनुभव देणार आहे. अतिशय सुंदर, रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत आहे. प्रेमाने ओतप्रोत असलेले त्याचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेले फुल हे या पोस्टरवर लक्षवेधक ठरत आहे. जस जसे या सिनेमाचे पोस्टर समोर येत आहे, तस तशी चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.

प्रकाश कुंटे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. मानसी सांगतात, “आता आम्ही लवकरच हिंदी, मराठी आणि गुजराती सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. आमची मराठी चित्रपटांची सुरुवात ‘कलरफुल’ सिनेमाने होत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. हा सिनेमा नक्कीच सर्वांना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही. तसेच मराठीसह गुजराती चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत”.

- Advertisement -

हेही वाचा – आलियाने विकतेय रणबीरचे कपडे, मिळणाऱ्या पैशातून करणार ‘हे’ काम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -