घरमनोरंजनकोरोना पॉझिटिव्ह सतिश कौशिक यांच्या तब्येतीत बिघाड

कोरोना पॉझिटिव्ह सतिश कौशिक यांच्या तब्येतीत बिघाड

Subscribe

१७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात वाढत आहे. त्यातच बॉलीवूडचे कलाकार आणि दिग्दर्शकांना कोरोनाने विळखा घातला आहे. बॉलीवूडचे जेष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते सतिश कौशिक यांनाही कोरोनाची लागण झाली. १७ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले. परंतू काही दिवसानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांना कोकीलाबेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. सतिश कौशिक यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्वत: ट्विट केले होते. सतिश कौशिक यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करुन घेतले मात्र, काही दिवसांतच त्यांनी अस्वस्थ वाटायला लागले. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत आणि पुर्णपणे बरे वाटेपर्यंत त्यांना हॉस्पीटलला राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते कोकीलाबेन हॉस्पीटलला प्रकृती स्थिर होईपर्यंत अॅडमिट झाले आहेत.

- Advertisement -

जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतिश कौशिक हे बॉलीवूडमधील नावाजलेले नाव आहे. सतिश कौशीक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सहायक निर्देशक शेखर कपूर यांच्या मासूम या चित्रपटातून केली. त्यांना मुख्य म्हणजे चित्रपट मिस्टर इंडियामधील केलेल्या भूमिकेसाठी सतिश कौशिक प्रसिद्ध आहे. त्यांना दोनवेळा बेस्ट कॉमेडियनसाठी बेस्ट फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला आहे.


हेही वाचा – अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही – शरद पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -