घरमहाराष्ट्रपवार साहेबांच्या म्हणण्यानुसार देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कोणी घेतली?

पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कोणी घेतली?

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही आहे. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपासून रुग्णालयात होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन होते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत पवारांच्या म्हणण्यानुसार देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कोणी घेतली? असा सवाल केला आहे.

अनिल देशमुख यांनी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटसंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. याबाबतचं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं होतं. हेच ट्विट रिट्विट कर फडमवीस यांनी सवाल केला आहे. “१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असं पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असं स्पष्टपणे दिसून येतं. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करतं आहे? असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही – शरद पवार


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -