घरदेश-विदेशहरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले CM तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेले CM तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार होते पण...

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा कहर सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ‘माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या देखरेखेखाली मी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात तुमच्यापैकी माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्या, कोरोनाची तपासणी करून घ्या’ असे तिरथ सिंह रावत यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे नुकतेच हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काही संतासह पूजा-अर्चा देखील केली होती. यासबोतच त्यांनी रविवारी एका क्रीडा कार्यक्रमात हजेरी देखील लावली होती. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे आजपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. दिल्लीत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या दिल्ली दौरा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री या पदाचा पदभार सांभाळणारे तीरथ सिंह रावत सतत चर्चेत आहे. यावेळी त्यांनी महिल्यांच्या कपड्यांवरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका होत होत्या. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रभू रामाशी तुलना केल्याचे वक्तव्य असो, यामुळे त्यांची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरू आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -