घरताज्या घडामोडीअनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - शरद पवार

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही – शरद पवार

Subscribe

परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्बद्वारे गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना बंगल्यावर बोलवून पैसे गोळा करण्यासंबंधीत माहिती दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा असणारे शरद पवार यांनी या आरोपाचे खंडन केलं आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची आहे. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात होते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावरुन परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शरद पवार म्हणाले.

अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होते, असं शरद पवार म्हणाले. “पदावरून पायउतार झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाविकास आघाडी सरकारवर या वादावर कोणताही दबाव नाही. मला खात्री आहे की एटीएस या प्रकरणाची योग्य चौकशी करेल आणि निर्णय समोर येईल. त्यामुळे या विषयावर आत्ताच काही बोलणे मला योग्य वाटत नाही,” असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -