घरमनोरंजन'महाभारत' करत दीपिका साकारणार दमदार भूमिका

‘महाभारत’ करत दीपिका साकारणार दमदार भूमिका

Subscribe

महाभारत या चित्रपटाचे दोन किंवा तीन भाग तयार केले जाणार आहे. त्यापैकी पहिला भाग हा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार

मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटानंतर निर्माता झालेली दीपिका पादुकोण नवी भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. निर्माता झाल्यानंतर दीपिकाने पहिल्यांदाच हा प्रोजेक्ट हातात घेतला आहे. दीपिका महाभारतावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असून विशेष म्हणजे महाभारत या चित्रपटात ती स्वतः द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. यााधीही तिने, मस्तानी आणि राणी पद्मावती यांच्या भूमिका साकारल्या होत्या आणि त्यासाठी तिचे कौतुकही केले गेले. आज दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

पद्मावतनंतर तिने रणवीर सिंगसोबत विवाह केला होता. त्यानंतर काही काळासाठी ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकायला ती तयार झाली आहे. तिच्या आगामी छपाक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षत उत्सुक असताना दीपिकाने महाभारत चित्रपट करणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली असून तिच्या सोबत मधु मंटेनाही महाभारत या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाच्या कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यामध्ये आहेत. महाभारत या चित्रपटाचे दोन किंवा तीन भाग तयार केले जाणार आहे. त्यापैकी पहिला भाग हा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. महाभारत या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. या चित्रपटाची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्शने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

- Advertisement -

‘मी द्रौपदीची भूमिका करणं माझ्यासाठी आव्हान असेल तसेच ती माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. महाभारताला पौराणिक कथा आणि सांस्कृतिक प्रभावासाठी ओळखले जाते. पण जीवनात अनेक धडे महाभारतातून मिळतात. सर्वाधिक धडे पुरुष पात्रांमधून मिळतात. यासाठी नव्या दृष्टीकोनातून ते समजून घेण्याची फक्त उत्सुकता नव्हे तर ते महत्वाचंही असेल’, असे दीपिकाने तिच्या भूमिकेबद्दल सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -