घरमनोरंजन‘ब्रह्मास्त्र’मधील 'देवा देवा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

यापूर्वी रिलीज झालेल्या 'केसरिया' गाण्यामध्ये रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. तर या 'देवा देवा' गाण्यामध्ये रणवीर भक्ति भावामध्ये तल्लीन झालेला दिसत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या केसरिया गाण्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील ‘देवा देवा’ या गाण्याचा टीझर मागील काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. दिग्दर्शक आयान मुखर्जी यांनी या गाण्याचा टीझर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सांगितले होते की, या चित्रपटातील हे पूर्ण गाणं सोमवारी ८ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात येईल. दरम्यान आता नुकतेच हे गाणं रिलीज करण्यात आले आहे.

‘देवा देवा’ गाणं इतकं सुंदर आहे की, त्या गाण्याची अनेकांना भुरळ पडू लागली आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या ‘केसरिया’ गाण्यामध्ये रणवीर आणि आलियाची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. तर या ‘देवा देवा’ गाण्यामध्ये रणवीर भक्ति भावामध्ये तल्लीन झालेला दिसत आहे. यातील संपूर्ण गाण्यामध्ये रणवीर अग्नि अस्त्रच्या रूपात दिसून येत आहे. शिवाय या गाण्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची झलक सुद्धा पाहायला मिळत आहे. ते रणवीरला त्यातील शक्तिची ओळख करून देताना दिसत आहेत. तसेच गाण्याच्या शेवटी रणवीरसोबत आलिया देखील रोमान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

‘देवा देवा’ या गाण्याला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरजीत सिंह आणि जोनिता गांधी यांनी मिळून गायले आहे. तसेच हे गाणं प्रीतमने कंपोज केलं असून या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत. हे गाणं पूर्णपणे रणबीर कपूरवर आधारित आहे. या गाण्यामध्ये रणबीर आगीसोबत खेळताना दिसत आहे.

‘ब्रह्मास्त्र’या दिवशी होणार प्रदर्शित
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसून येतील. तसेच अभिनेता शाहरूख खान सुद्धा चित्रपटात कॅमियो रोलमध्ये दिसून येईल. ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून हा हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.


हेही वाचा :Independence Day 2022 : भारतातल्या ‘या’ 6 सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्ड होण्याचा मान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -