घरमनोरंजनमाधुरीचा चित्रपट '१५ ऑगस्ट' होणार २९ मार्चला प्रदर्शित

माधुरीचा चित्रपट ‘१५ ऑगस्ट’ होणार २९ मार्चला प्रदर्शित

Subscribe

या चित्रपटाची कथा अतिशय उत्कृष्ट असून हा चित्रपट बघताना प्रेक्षकाला आपलासा जरूर वाटेल यात शंकाच नाही.

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या आगामी मराठी निर्मिती ‘१५ ऑगस्ट’ हा चित्रपट २९ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ” माझी नेहमी अर्थपुर्ण असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करण्याची इच्छा होती, आणि याकरीता ‘१५ ऑगस्ट’ या चित्रपटापेक्षा उत्तम सुरूवात इतर कोणतीच असू शकत नाही.”असे माधुरीने सांगितले. तिच्या या अर्थपुर्ण असणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटाची कथा अतिशय उत्कृष्ट असून हा चित्रपट बघताना प्रेक्षकाला आपलासा जरूर वाटेल यात शंकाच नाही. या चित्रपटात नामवंत स्वप्नील जयकर, कलाकार राहूल पेठे, मृण्मयी देशपांडे आणि आदिनाथ कोठारे यांनी आपल्या अभिनय शैलीने चित्रपटातील व्यक्तिरेखेस चार चॉंद लावले आहे. असे देखील माधुरीने सांगितले.

हा चित्रपट मुंबईतील एका चाळीवर आधारित असून या चाळीतील रहिवासी स्वतंत्र्य दिवसाचे औचित्य साधत तिरंगा फडकवण्याची तयारी करतात. याचदरम्यान या एकाच दिवशी अनेक दुर्घटना घडतात. यावेळी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या चाळीतील रहिवाशांच्या मते स्वातंत्र्य, प्रेम आणि मैत्री म्हणजे काय ? समाजात वावरताना स्वातंत्र्य, प्रेम आणि मैत्री यांच्यावर काय बंधन येतात. यावर चित्रपट भाष्य करतो.

- Advertisement -

“फायरब्रँड” नंतर नेटफिक्ससाठी हा दुसरा मराठी प्रकल्प आहे. धकधक गर्ल माधुरी दिक्षीतचे पती श्रीराम नेेन या चित्रपटाची निर्मीती करणार आहेत. १९० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -