घरमनोरंजनवजनावरून ट्रोल करणार्‍या नेटकर्‍यांवर भडकली धनश्री काडगावकर

वजनावरून ट्रोल करणार्‍या नेटकर्‍यांवर भडकली धनश्री काडगावकर

Subscribe

'तुझा फूटबॉल झाला आहे' अश्या प्रकारच्या कमेंट करून ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्ट विषयी तसेच आपल्या खाजगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री धनश्री काडगावकर ही माराठमोळ्या अभिनेत्रीमधील एक नावाजलेला चेहरा आहे. धनश्री सोशल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी धनश्रीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे .सध्या धनश्री तिझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासोबत मजेत दिवस एंजॉय करतांना दिसतेय. प्रसूतीनंतर धनश्रीचे वजन वाढलं आहे आणि एक अभिनेत्री असून सुद्धा वाढलेल्या वजनाच न्युनगंड न बाळगता धनश्री बिधास्तपणे तिच्या मुलासोबत अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करते. पण सोशल मीडिया म्हटलं की ट्रोलिंग सुद्धा आलच काहीसा नकारात्म दृष्टीकोण असणार्‍या लोकांनी धनश्रीला वाढलेल्या वजनावरून ट्रोल करण्यास सुरूवात केली. ‘तुझा फूटबॉल झाला आहे’ अश्या प्रकारच्या कमेंट करून ट्रोल करण्यात आलं. पण धनश्रीने या ट्रोलर्सला न जुमानता त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

 

- Advertisement -

‘तुम्ही सोशल मीडियावर तुमचे खरे नाव सुद्धा ठेवू शकत नाही, तुम्ही महिलांना अशा प्रकारची वागणूक देतात का?’ असा सवाल करत तिने आक्षेपहार्य कमेंट करणार्‍या ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहे. या घटनेनंतर धनश्रीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत ट्रोलर्सला धारेवर धरलं. तसेच ट्रोलर्सच्या अकाऊंटला रीपोर्ट करण्यास सुरवात केली. आपल्या चाहत्यांना आपली बाजू घेतांना पाहून धनश्री खूप खुश झाली तसेच तिने चाहत्यांचे आभार मानले.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेत्री हिना खानला पितृशोक,हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे झाले निधन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -