घरमनोरंजनदिलीप कुमार यांच्यावर जुहूतील कब्रस्थानात होणार दफनविधी

दिलीप कुमार यांच्यावर जुहूतील कब्रस्थानात होणार दफनविधी

Subscribe

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांनी पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत कामगिरी केली आहे

हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर तारा आज निखळला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ७.३० वाजता दिपील कुमार यांचे निधन झाले. बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात आपली कारकिर्द घडवणारा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता हरपल्याने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांना 30 जुन रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्नालयात उपचारा करीता दाखल करण्यातआले होते. आता दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्नालयातून घरी नेण्यात येत आहे. यादरम्यान दिलीप कुमार यांच्या प्रत्येक कठीण काळात त्यांची पत्नी सायरा बोनो यांची साथ लाभली.प्रत्येक क्षणी त्यांनी दिलीप कुमार यांना पाठींबा दिला. सांताक्रुज मुंबईतील जुहू कब्रिस्तन मध्ये आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांना दफन करण्या  येणार आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउटवरुन याची माहिती देण्यात आली आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तने संपुर्ण जगात खळबळ उडाली तसेच दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक राजकारणी मंडळी तसेच दिग्गज कलाकारांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकचं नाही तर अनेक  कलाकार दिलपी कुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरीता त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

 दिलीप कुमार

- Advertisement -

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 साली झाला होता. दिलीप कुमार यांनी पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत कामगिरी केली आहे.याचदरम्यान, ५० च्या दशकांतील अनेक बड्या नायिकेंसह त्यांचे नाव जोडले गेले. मधुमती, मधूबाला यांच्यासोबतचे त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. शेवटी दिलीप कुमार यांनी त्यांच्या वयापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सायरा बानो हिच्याशी लग्न केले.

- Advertisement -


हे हि वाचा – दिलीप कुमार यांना पाकिस्तान कडून सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाल्यानंतर,महाराष्ट्रात तापले होते राजकारण



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -