घरमहाराष्ट्रभाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकत्र; फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं

भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकत्र; फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं

Subscribe

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर सर्व आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत कैफियत मांडली. दरम्यान आता पुन्हा एकदा हे बारा आमदार एकवटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी खलबतं सुरु आहेत.

भाजपचे निलंबित १२ आमदार आज सकाळी ११ च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत न्यायालयात जाण्यावर चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. १२ आमदारांच्या निलंबनानंतर पुढे कायदेशीर पर्याय काय आहेत? कोर्टात बाजू कितपत टिकून धरेल, केरळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो, आदी बाबींवर यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

न्यायालयात जाणं योग्य ठरेल का?

Adv. असीम सरोदे यांनी निलंबित आमदार न्यायालयात गेल्यास काय होऊ शकतं यावर माहिती दिली. सभागृहातील अंतर्गत घडामोडींमध्ये दखल देण्याचे न्यायव्यस्थेलाही घटनात्मक अधिकार नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात जाऊन निलंबित आमदारांना खूप उपयोग होईल असं वाटत नाही, असं सरोदे म्हणाले.

विधीमंडळ परिसरात भाजपने भरवली प्रतिविधानसभा

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानं भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी भाजपनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना अध्यक्षपदी बसवत प्रतिविधानसभा भरवत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -