घरमनोरंजन'अजीब दास्तान' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘अजीब दास्तान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

लॉकडाउनमुळे अनेक गोष्टींसह सिनेमागृहावरही निर्बंध घालण्यात आले. अनेक सिनेमांचे चित्रीकरण थांबले असून, बहुतेक सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा ‘अजीब दास्तान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक करण जोहरने या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या इंस्टाग्राम अकांउंटवर शेअर केला आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. करण जोहरचा या सिनेमामध्ये चार वेगवेगळ्या कथा दाखवल्या जाणार आहेत. अजीब दास्तान चित्रपट १६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अजीब दास्तान या सिनेमात फातिमा सना शेख, शेफाली शहा, मानव कौल, आदिती राव हैदरी, तोता रॉय चौधरी, इनायत वर्मा, कोंकणा सेन शर्मा, अभिषेक बॅनर्जी , नुसरत भरत , जयदीप अहलावत या कलाकारांचा यात समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

करण जोहरने सोशल मिडियावर ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये म्हणाले की, ‘अजीब दास्तान या सिनेमात चार चलाख व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करताना दिसणार असून, हा एक सहयोगी प्रयत्न आहे’. करण जोहरने अजीब दास्तानचा थरारक ट्रेलर शेअर केला आहे. आता प्रेक्षकांना या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. कोरोनामुळे अनेक सिनेमांचे प्रदर्शन झाले नव्हते. कोविडने बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना विळखा घातला होता. त्यात बिग बींसह करण जोहरचाही समावेश होता.


हेही वाचा – १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षा ऑफलाईन होणार; शिक्षणमंत्र्याची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -