घरमनोरंजनदिग्दर्शकाला माझ्यासोबत झोपायचं होतं - एली अवराम

दिग्दर्शकाला माझ्यासोबत झोपायचं होतं – एली अवराम

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि हिंदी बिग बॉस या रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक एली अवरामने आपल्या आयुष्यात आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. ‘एका दिग्दर्शकाने मला हात मिळवताना कास्टिंग काऊचचा इशारा केला. मात्र, मला तो समजला नाही. काही दिवसांनी समजले की, त्या इशाऱ्यामार्फत दिग्दर्शकाला माझ्यासोबत झोपायचे होते. मात्र, मी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने मला वगळून दुसऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात घेतले’, असे एलीने म्हटले. ‘पिंकवीला’ या वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली. याशिवाय तो प्रोजेक्ट मोठा होता. त्यामुळे त्या चित्रपटाची संधी हुकल्याने आपल्याला फार दु:ख झाल्याचे देखील एली म्हणाली.

बॉलिवूडमध्ये अनेक तरुणी आपले भविष्य आजमवायचा प्रयत्न करतात. स्वीडनमध्ये शिक्षण घेतलेल्या एली अवरामला देखील बॉलिवूडमध्ये करिअर करायचे होते. त्यामुळे तिने बॉलिवूडसाठी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. दरम्यान, सुरुवातीला तिला नकारात्म प्रतिक्रियांना सामोरे जावे लागल्याचे एली अवरामने म्हटले आहे. ‘बॉलिवूडशी संबंधित एक मुलगी मला म्हणाली की, तुला तुझे वजन कमी करायला हवे. तुझी उंची देखील कमी आहे. याशिवाय तुझ्या दातांची आणि कपाळाची रचना पाहता तू अभिनेत्री बनू शकत नाही. मात्र, मी त्याकडे जास्त लक्ष्य दिले नाही. दरम्यान, एकाने तर मला म्हटले होते की, तुझ्या लांब केसांमुळे तू आंटी वाटतेस. मात्र, मी याकडे लक्ष्य दिले नाही’, असे एली मुलाखतीत म्हणाली.

- Advertisement -

यापुढे एली मुलाखतीत म्हणाली की, ‘दरम्यान, मी काही चित्रपटांसाठी मुलाखती देत होती. यावेळी एका दिग्दर्शकाने माझ्याशी हॅम्डशेक करताना माझ्या एका बोटाला खाजवल्यासारखे काहीतरी केले. मी ही बाब माझ्या एका मित्राला सांगितली. तेव्हा त्याला आश्चर्याचा झटका बसला. त्याने मला त्याचा अर्थ विचारला. मी नाही म्हटले. तेव्हा त्याने सांगितले की, त्या डायरेक्टरने तुझ्याकडे कास्टिंग काऊच म्हणजे सोबत झोपायची मागणी केली होती. ही बाब एकताच क्षणी मला मोठा धक्का बसला.’ त्यानंतर एलीने ‘मिक्की वायरस’ आणि ‘बिग बॉस’मध्ये काम केले.


हेही वाचा – ‘कामाख्या’च्या रुपातील तेजस्विनीचं सौंदर्य तुम्ही पाहिले का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -