घरमुंबईअखेर भाजपा-शिवसेना युती झाली हो...!

अखेर भाजपा-शिवसेना युती झाली हो…!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना – भाजपा युती होणार का याबाबत सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून शिवसेना-भाजपा युती झाल्याचे पत्रकच जारी करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती यांचादेखील या महायुतीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज, रात्री उशीरापर्यंत भाजपा आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्याची शक्यता आहे.

काय आहे पत्रकात –

- Advertisement -

जागांचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात – 

दरम्यान, महायुतीची घोषणा झाली असली तरी जागांचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला असून या महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार याचा तपशील लवकरच सांगण्यात येईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युती झाली असली तरीही नेमक्या किती जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -