घरमनोरंजन‘दबंग ३’ चित्रपटाच्या गाण्यातील आक्षेपार्ह प्रसंग वगळले !

‘दबंग ३’ चित्रपटाच्या गाण्यातील आक्षेपार्ह प्रसंग वगळले !

Subscribe

‘दबंग ३’ या चित्रपटातील ‘हूड हूड दबंग’ या गाण्यात हिंदु साधू आणि देवता यांचा अपमान केल्याने हिंदु समाजात संतापाची भावना निर्माण झाली होती. देशभरात अनेक हिंदुत्ववादी संघटना, आखाडा परिषद, संतसमाज आदींनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता.

हिंदु जनजागृती समितीने या चित्रपटाच्या विरोधात ‘सेन्सॉर बोर्डा’ला निवेदन दिले, त्यानंतरही काही न झाल्याने पुणे येथे डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तसेच देशभरात अनेक ठिकाणी समितीने आंदोलनेही केली. परिमामी ‘सेन्सॉर बोर्डा’च्या अधिकार्‍यांनी समितीच्या शिष्टमंडळाला आक्षेपार्ह प्रसंग वगळल्याचे सांगितले.

- Advertisement -

‘सलमान खान फिल्म्स’च्या वतीने ‘सर्वांच्या भावना लक्षात घेऊन ‘हूड हूड दबंग’ या गाण्यातून आम्ही काही दृश्ये वगळत आहोत’ असे ट्वीट करून जाहीर करण्यात आले. त्यामुळे ‘देर आये दुरुस्त आये’ या म्हणीनुसार उशीरा का होईना, हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय हिंदूंच्या संघटितशक्तीच्या दबावामुळेच घ्यावा लागला असून यापुढेही कोणी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून चित्रपटनिर्मिती करतील, त्यांना अशाच विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -