घरमनोरंजन'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये आलियाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये आलियाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Subscribe

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणार हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा टीझर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आलियाने या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात आलिया खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या ट्रेलरमध्ये आलियाला पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात आलिया, जेमी डोर्नन आणि गॅल गॅडॉट सारख्या मोठ्या हॉलिवूड कलाकारांसोबत दिसणार आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

नेटफ्लिक्सचा जागतिक कार्यक्रम सध्या ब्राझीलमध्ये सुरु आहे. ज्यामध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात वंडर वुमन स्टार गॅल गॅडॉटने होते. त्याच्यासोबत ‘हार्ट ऑफ स्टोन’चा पुरुष स्टार जेमी डोर्ननही दिसत आहे. या कथेत दोघांचा रोमँटिक अँगल असणार आहे. जेमी देखील रॅचेल सारख्याच इंटेलिजन्स युनिटशी संबंधित असल्याचे दिसते.

- Advertisement -

या बॉलिवूड अभिनेत्रींनीही केलंय हॉलिवूडमध्ये पदार्पण

आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड मधील चित्रपट आहे. याआधी ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडासह काही कलाकारांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रियंका चोपडाने तर ग्लोबल स्टार बनून देशाचे नाव उंचावले आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात रणवीर सिंह दिसणार आहे.


हेही वाचा :

माझं लक्ष फक्त टाळ्यांवर आहे… ‘आदिपुरुष’च्या वाढत्या टीकेवर कृतीचं उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -