घरमनोरंजनFriendship Day 2023 : बॉलिवूडमधील BFF सेलिब्रेटी

Friendship Day 2023 : बॉलिवूडमधील BFF सेलिब्रेटी

Subscribe

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअॅप, फेसबुक, एसएमएस, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छांचा देताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये देखील काही सेलिब्रिटींची खास मैत्री आहे. बॉलिवूडमध्ये कोण आहेत हे जिगरी दोस्त ते पाहा……

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त बेस्ट फ्रेंडस आहेत. सलमान जेव्हा संजय दत्त जेलमध्ये होता तेव्हा त्याला भेटायला जात होता. सलमान खान हा आपला चांगला मित्र असून तो कायम चांगला मित्र राहील, असं अनेकदा संजय दत्त म्हणाला आहे.

- Advertisement -

अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे दोघे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे रोहितच्या अनेक चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत दिसतो. या दोघांची अतूट मैत्री आजही तशीच टिकून आहे.

शाहरुख आणि काजोलच्या जोडीने एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ऑनस्क्रीनवर रोमान्स तर ऑफस्क्रीनवर निखळ मैत्री या दोघांची आहे.

कपूर आणि अरोरा सिस्टर्स अनेकदा पार्टी, शॉपिंग करताना एकत्र दिसल्या आहे. तसेच काही वेळा एकत्र वर्कआउट करताना देखील या चौघीजणी दिसल्या आहे. सोशल मीडियावर या चौघींचे फोटो देखील अनेकदा व्हायरल झाले आहेत.

कतरिना कैफचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर असला तरी अलियाची मैत्री कतरिना सोबत अजूनही कायम आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत.

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे दोघे खूप चांगले मित्र आहे. पार्टी किंवा अनेक कार्यक्रमात दे दोघे एकत्र असतात. काही वेळा सोशल मीडियावर दोघे एकमेकांची टर्र उडवत असतात देखील दिसले आहेत.

वरुण धवन आणि आलिय भट्टची फ्रेंडशिप सर्वांच माहित आहे. एकाच चित्रपटातून या दोघांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली.

किंग खानची मुलगी सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर या तिघी बेस्ट फ्रेंड आहे. अनेक ठिकाणी या तिघी मौजमजा करताना दिसल्या आहे.


हेही वाचा- Friendship Day 2023 : निखळ मैत्री दाखवणारे ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सिनेमे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -