घरमनोरंजनमिर्जापूर सीझन २ - या तारखेला प्रदर्शित होणार

मिर्जापूर सीझन २ – या तारखेला प्रदर्शित होणार

Subscribe

मिर्झापूरच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण संपले असून लवकरच दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता अली फजलने सांगितले.

अॅमेझॉन प्राइमवर नोव्हेंबर, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.आता पुन्हा एकदा गुड्डूच्या भूमिकेतील अभिनेता अली फजल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वेळेस प्रेक्षकांना गुड्डूची एक वेगळी बाजू पहायला मिळेल, असं अली फजलने सांगितले. मिर्झापूर ही एक क्राइम थ्रिलर मालिका असून मालिकेच्या दुसऱ्या भागाचे अर्ध्याहून अधिक शूट मिर्झापूर या ठिकाणी झालं आहे. या मालिकेत उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागातील माफिया डॉनच राज्य आणि त्यांच्या शत्रूबरोबरच कायम चालू असलेला संघर्ष दाखवला आहे. बंदूक, ड्रग्ज आणि बेकायदेशीर जगणं या सगळ्यावर आधारीत असलेल्या या मालिकेचा दुसर भाग एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे अली फजलने सांगितले.

- Advertisement -

“दुसऱ्या भागाचे चित्रीकरण उरकलेलं असून सध्या एडिटींगची प्रक्रिया सुरु आहे. २०२० च्या एप्रिलपर्यंत दुसरा भाग रिलीज होईल, असा माझा अंदाज आहे. या भागात भरपूर नवीन गोष्टी असणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये माझी भूमिका खूप वेगळी आहे. या वेळेस ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फारच त्रासदायक होतं” असं अली फजलने सांगितले.

View this post on Instagram

Gormint ! #mood

A post shared by ali fazal (@alifazal9) on

- Advertisement -

कालीन भैय्या म्हणजे संपूर्ण मिर्जापूर मध्ये भिती पसरवणारं नाव. मिर्जापूरचा मुख्य माफिया म्हणजे कालीन भैया, पंकज त्रिपाठी यांनी ही भूमिका साकारली आहे. पहिला सीझन एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित असून, पंकज त्रिपाठी, विक्रांत मस्से, दिवेंदू शर्मा, रसिका दुगल, श्रिया पिळगावकर आणि श्वेता त्रिपाठी या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली. पहील्या सीझनच्या शेवटी बबलू (विक्रांत मस्से) आणि स्वीटी (श्रिया पिळगावकर) हे मेलेले दाखवले आहेत तर पुढील सीझनमध्ये ते दोघेही प्रेक्षकांना दिसणीर नाही. फजल सध्या केनेथ ब्रेनाघच्या ‘डेथ ऑन दि नाइल इन लंडन’ या चित्रपटातं चित्रीकरण करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -