घरदेश-विदेशअभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

Subscribe

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर याआधी भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनाही अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय अर्थतज्ज्ञाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच जागतिक स्तरावरची गरिबी हटवण्याच्या बद्दल केलेल्या संशोधनाबद्दल अभिजीत बॅनर्जी यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत इस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर या अर्थतज्ज्ञांनाही हा मानाचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

- Advertisement -

अभिजीत बॅनर्जी यांच्याविषयी…

मूळचे भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. १९८१ साली कोलकाता विद्यापीठातून बॅनर्जी यांनी बीएससी (BSc) केलं तर १९८३ मध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू (JNU) मधून एमए (MA) पूर्ण केले आहे.

अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना पुरस्कार देण्यात आल्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्यानंतर रविंद्रनाथ टागोर, सी.व्ही.रामन, मदर तेरेजा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे म्हणाले, आदित्यला निवडणूक लढवावी वाटली तर त्यात गैर काय?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -