घरमनोरंजनदक्षिण कोरियात 'गली बॉय'चा अटकेपार झेंडा; मिळाला ‘हा’ पुरस्कार

दक्षिण कोरियात ‘गली बॉय’चा अटकेपार झेंडा; मिळाला ‘हा’ पुरस्कार

Subscribe

या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असणारा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘गली बॉय’ हा चित्रपट झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांची मनंच नाही तर विदेशी प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगण्यात आली आहे.

- Advertisement -

‘गली बॉय’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पाच दिवसानी या चित्रपटाने ७० कोटींचा टप्पा पार केला होता. यासह काही रेकॉर्डस देखील मोडले असून आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नुकताच ‘गली बॉय’ या चित्रपटाला दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मिळाला ‘हा’ पुरस्कार

दक्षिण कोरियामध्ये झालेल्या २३ व्या बीआयएफएएन म्हणजे बुकियॉन इंटरनॅशनल फॅटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गली बॉय’ या चित्रपटाला ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमा’ हा पुरस्कार मिळाल्याने गली बॉयचा दक्षिण कोरियात डंका वाजल्याचे बघायला मिळाले.

- Advertisement -

‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमा’ मधील काही सदस्य आणि कला क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा या एनइटीपीएसी निवड समितीमध्ये असतो. या समितीच्या माध्यमातून वर्ल्ड फॅटास्टिक ब्लू सेक्शनमधून सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाची निवड केली जाते. ही निवड करताना विनोदीपट, ड्रामा अशा विभागात मोडणारे आणि नव्या धाटणीचे व आशयपूर्ण चित्रपटांचा या पुरस्काराकरिता विचार करण्यात येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -